जळगाव । घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 जयंती जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळा, प्रशासकिय, सामाजिक, राजकीय व खासगी संस्थेत जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यात रक्तदान शिबीर, शहरातून मिरवणूक, मोटारसायकल रॅली यांसह मान्यवरांकडून उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याला उजाळा देण्यात आला. तसेच गावागावात स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये चेअरमन संजय वाघ यांनी माल्यार्पण केले, धरणगाव नगरपरीषदेतर्फे नगराध्यक्ष सलिम पटेल यांनी पुष्पहार घातला, आचार्य गरूड माध्यमिक विद्यालयात अभिवादन केले, चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात प्रा. अरूणभाई गुजराथी यांनी मार्गदर्शन केले.
गो.से.हायस्कूल, पाचोरा
पाचोरा । येथील श्री.गो.से. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय वाघ हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीस सागर थोरात, ए.बी. अहिरे आणि आर.एन. सपकाळे यांनी त्रिसरण पंचशील सादर केले. ए.बी.अहिरे आणि शाळेचे चेअरमन खलील देशमुख यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा व व्यक्तित्वाचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला. कार्यक्रमाला संस्थेचे व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, जेष्ठ संचालक सतीश चौधरी, मुख्याध्यापक एस.डी.पाटील, उपमुख्याध्यापक एल.एस.शिंपी, पर्यवेक्षक ए.जे.महाजन, पी.जे.पाटील, पी.पी.पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर आभार ए.जे. महाजन यांनी मानले.
धरणगाव नगरपरिषदेतर्फे महामानवास अभिवादन
धरणगाव । नगरपरिषदेतर्फेे 14 रोजी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नगराध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम सादर करण्यात आले. सकाळी 8.30 वाजता नगराध्यक्ष सलिम पटेल यांच्याहस्ते पुतळ्या पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री वराड, नगरसेवक सुरेश महाजन, उज्वला साळुंखे, कल्पना महाजन, भागवत चौधरी, अंजली विसावे, शिवसेना गटनेतो विजय भाले, नगरसेवक प्रविण चौधरी, अराधना पाटील, किर्ती मराठे, अहमदा खान पठाण, मंदा धनगर, अजय चव्हाण, पार्वताबाई पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांनी माल्यार्पण केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, तालुका प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, उपशहर प्रमुख भरत महाजन, विभाग प्रमुख संजय चौधरी, युवासेना शहरप्रमुख संतोष महाजन, विलास महाजन, धिरेंद्र पुरभे, मच्छिंद्र पाटील, किरण अग्रीघेमी, विशाल महाजन, लक्ष्मण महाजन, डॉ. विलास महाजन, राहुल शेळके, अफजल पठाण, पुष्ण कंखेर, सुनिल जावरे, संजय महाजन, रविंद्र कंखरे, जयेश महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थित होती.
शेंदुर्णी गरूड विद्यालय
शेंदुर्णी । आचार्य गरूड माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. व्ही.वाय.सपकाळे होते. प्रास्तविक प्रा.सविता पवार यांनी आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. मन्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यातल आले. त्यानंतर शिवपुजे मॅडम यांनी आंबेडकरांच्या जिवनाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपशिक्षक डी.बी.म्हस्के, बी.जी.माडवडे, उपमुख्याध्यापक एस.डी.चव्हाण आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षक एस.एस.जैन, डी.आर.शिंपी, इयत्ता पाचवी ते बारावी च्या सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा.एस.आर.पाटील यांनी केले तर आभार सचिन सुर्वे यांनी मानले.