धुळे। धुळे टक्सटाईल मिल मधील कामगार कर्मचार्यांनी सुधारित स्वेच्छा निवृती योजना (चतठड) अंतर्गत अर्थिक लाभ मिळणे करिता व्यवस्थापनाकडे अर्ज सादर केले होते. सदर अर्जची मंजुरी राष्ट्रीय वस्त्रउद्योग महामंडळ (छढउ) नवी दिल्ली यांच्या मार्फेत होते. परंतु गेल्या दीड वर्षापासून सदर कामगार व कर्मचार्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष झाले होते. सदर योजनांचा लाभ मिळणेकिरता मान्यता प्राप्त संघटना राष्ट्रीय मिल मजदूर संघाने संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना कामगारांच्या वतीने निवेदन सादर केले.
42 कामगार व कर्मचार्यांना मिळणार लाभ
यानुसार डॉ. सुभाष भामरे यांनी एन.टी.सी. (छढउ)चे अधिकारी वर्गाशी संपर्क साधला व त्यांना मागणी संबंधी पत्र दिले. यासोबतच डॉ. भामरे यांनी केंद्रीय वस्त्रउद्योग मंत्री स्मृती इराणी यांचेकडे संघटनेच्या पदाधिकार्यांना घेऊन पाठपुरावा केला. एन.टी.सी. (छढउ) चे चेअरमन पी.सी. वैद्य व एच.आर. डायरेक्टर आर.के. सिन्हा यांचेशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांना यश येवून 14 मार्च रोजी एन.टी.सी.चे एच. आर. डायरेक्टर आर.के. सिन्हा यांचेशी चर्चा करुन 42 कामगार व कर्मचार्यांना एमव्हीआरएस(चतठड) मंजूर करून घेतला. त्यानुसार या कामगार व कर्मचार्यांना अंदाजे चार कोटी पन्नास लाख रूपयांचा अर्थिक लाभ मिळणार आहे. लवकरच सदरील अर्थिक लाभ कामगारांना प्रत्यक्ष प्राप्त होणार आहे. सदरील चर्चेचे वेळी राष्ट्रीय मिल संघाचे होते. यासाठी भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल रष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेेक्रेटरी मच्छिंद्र येरडावकर, रामकृण बगदे, दयाराम पाटील, अशोक टकले, अशोक चहाण, राधेश्याम घाडने, दत्तु पवार, दतात्रय कवी, छोटू पोतदार, किशोर वाघ, संभाजी चौगुले, रमेश यादव, राजू देशपांडे, दत्तात्रय खैरनार व कामगार कर्मचार्यांनी डॉ. सुभाष भामरे यांचे मनपूवक आभार मानले.