नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आज कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्ष मुख्यालयात आले होते. यावेळी त्यांना माध्यमांनी त्यांच्या जीवनावर टीकात्मक भाष्य करणाऱ्या ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाबद्दल विचारले असता. त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.
‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.