नवी दिल्ली-सध्या माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कॉंग्रेस पक्ष व गांधी परिवारावर यातून थेट हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान कॉंग्रेसने याला उत्तर दिले असून डॉ.मनमोहनसिंह हे अॅक्सिडेंटल नव्हे तर एक्सलेंट पंतप्रधान होते असे सांगण्यात आले आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मनमोहनसिंह यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी परिश्रम घेतले आहे. त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहे. त्यांचे कार्य हे मोठे असून भाजप राजकारण करत आहे असे आरोप त्यांनी केले आहे.
भाजपला मोदी हे अपघाताने पंतप्रधान म्हणून लाभले आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.