जळगाव । आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.अरविंद मोरे यांच्या खून प्रकरणी पोलिस तपासात अनैतिक संबंधातून तर हा खून झाला नाही ना ? या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान मृतदेहाजवळील रक्तात एक लहान आकाराचे फुटप्रिंट आढळले असल्याचे त्याच्यावर देखिल तपास केंद्रीत झाला आहे. त्यासाठी फॉरेन्सिक तपासणीच करण्यात आली आहे. गेल्या दोन पोलिसांनी या प्रकरणी महिलांसह 12 ते 13 जणांची चौकशी केली आहे. तसेच पोलिसांनी मंगळवारी रात्री एका महिलेसह पुरूषाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या अँगलने तपास करण्यात येत आहे.
डॉ. मोरे खुन प्रकरण
पोलिस प्रशासनातर्फे तपासाला वेग देवून प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा तपास काढून चौकशी सुरू होती. यातच नाशिक, धुळे या ठिकाणी दोन पथके तपासासाठी पाठविण्यात आली आहे. पथकांकडून डॉ. मोरे यांच्या संपर्कातील अधिकारी, कर्मचारी, मित्र तसेच घरकाम करणार्या महिला यांच्यासह कुटूंबियांची चौकशी करण्यात आली आहे. तर पोलिस तपासात त्यांच्या मोबाईल कॉल्सवरून त्यांच्या संपर्कातील सर्व संशयितांची चौकशी करण्यात आली. यावरून नाशिक येथील आरोग्य विभागात महिला कर्मचारी (नर्स) व धुळे येथील आरोग्य विभागाचा पुरुष कर्मचारी यांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रातच पोलिसांना खुना संदर्भात धागेदोरे हाती लागले असून त्यानुसार संशरिताचा शोध पोलिस घेत आहे.
या खून प्रकरण पोलिसांनी नाशिक येथिल एक महिला, भुसावळ येथिल दोन महिला व धुळे येथील एका व्यक्तीला ताब्यात घेवून चौकशी केली आहे. डॉ.मोरे यांची सोमवारी गळा चिरून निर्घण हत्या झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली होती, याप्रकरणी पोलिस तपासात त्यांच्या मोबाईल कॉल्सवरून त्यांच्या संपर्कातील सर्व संशयितांची चौकशी करण्यात आली. यावरून नाशिक येथील महिला कर्मचारी व धुळे येथील आरोग्य विभागाचा पुरुष कर्मचारी यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्रभर कसून चौकशी केली आहे. त्यांच्या माहीतीची पडताळणी करण्यासाठी एक पथक नाशिक येथे रवाना झाले आहे.
करवत घरातीलच
दरम्यान ज्या करवतीसारख्या चाकूने डॉक्टर यांचा गळा चिरला गेला आहे. तो चाकू डॉक्टर मोरे यांच्या घरातीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्या मृतदेहाजवळील रक्तात त्यांच्या व्यक्तिरिक्त पावलांचे ठसे आढळले होते. त्यात एक लहान आकराच्या फुटप्रिंटबाबत देखिळ तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
अनैतिक संबधाचा संशय
खून अनैतिक संबधातून तर झाला नाही ना ? या दृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. मोबाईलच्या सीडीआरमधून त्यांच्याशी संपर्कात असलेले काही विशिष्ट लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे. तसेच त्यांच्या व्हाट्सअप चॅटची तपासणी करण्यात येत आहे. तसेच डॉ. मोरे यांच्या कुंटुबियांची देखिल पोलिंसाकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यांचे कुटुंबातील संबधांची देखिल माहीती पलिसांकडून घेतली जात आहे.