डॉ. मोहन आगाशे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0

पुणे । मनोदय मेंटल हेल्थ फोरम पुणेच्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तीस देण्यात येणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना नुकताच जाहीर झाला असून 19 ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती फोरमचे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवान यांनी दिली.

कर्वे समाज सेवा संस्थेत प्रा. चेतन दिवान यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुप्रकाश चौधरी, प्रा. महेश ठाकूूर बैठकीमध्ये डॉ. आगाशे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी हा पुरस्कार डॉ. उल्हास लुकतुके यांना देण्यात आला होता. मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार आगाशे यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रा. दिवान यांनी सांगितले.