शहादा । आयएएस पदावर निवड झालेले डॉ.योगेश भरसट यांचा गौरव सोहळा शहादा येथे ट्रायबल टँलेंट सर्च फाउंडशेनतर्फे 2 जुलै रोजी लोकमान्य टिळक टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात येणार आहे.यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष साविञीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयएएस परीक्षा उत्तीर्ण डॉ.योगेश भरसट व आयएएस अजय खर्डे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास आदिवासी तरूण आणि ट्रायबल टँलेंट सर्च फाउंडेशन या संस्थेच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडणा-या लघुचिञपटाचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच 10 वी 12 वीच्या वर्गात यश प्राप्त करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्यवर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अनुसूचित जमातीतील गुणवंत विद्यार्थीनी वसंत पावरा व युवराज पावरा यांच्यसह तालुकाध्यक्षांसोबत संपर्क करण्याचे कळवण्यात आले.