नंदुरबार । नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार मानले जाणारे हिरा उद्योग समुहाचे डॉ.रविंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भेट घेवून चर्चा केली. त्यामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित झाले आहे. नवरात्रीच्या काळात प्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, आमदार डॉ.विजयकुमार गावित, आमदार शिरीष चौधरी, विजय चौधरी आदी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून डॉ.रविंद्र चौधरी यांची भाजपात जाणार अशी चर्चा सुरु होती.