उरुळी कांचन : जगात विषाणूजन्य कोरोना आजारामुळे जनता भयभीत झाली असून शासनाने आपत्ती निवारण कायदा लागू केला आहे, अश्या वेळी इतर संसर्ग वाढू शकतो म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती निवारण कायदा लागू करण्यात आला आहे. खाजगी दवाखाने व रुग्णालये सुरू ठेऊन आवश्यक ती रुग्णसेवा देणे वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांचे कर्तव्य आहे, त्यामुळे आरोग्यसेवा पुरवावे असे आदेश देण्यात आले आहे. 24 तास श्यक्य नसेल तर काही तास का होईना आरोग्यसेवा द्यावी असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांनी व्यक्त केले असून आपल्या डॉ रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे ते रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत .तसेच डॉ रविंद्र भोळे ह्यांनी मराठवाडा भूकंपात कार्य केले असून उरुळी कांचन येथे गॅस्ट्रो साथीत रुग्णसेवा केलेली आहे. तसेच पुरंदरच्या पूर्व भागात दुष्काळात अत्यल्प दारात आरोग्य सेवा केलेली असून विविध क्षेत्रातील त्यांचे सामाजिक,धार्मिक, अपंग ,वृक्षा रोपण ,व्यसनमुक्ती, संस्थात्मक कार्य, व इतर अनेक क्षेत्रातील निष्काम सेवाभावी कार्य गेली 30 वर्षा पासून ते करीत असून ते राज्यातील,डॉ रविंद्र भोळे समाजसेवेचे एक मॉडेल आहे.मॅगसेसे अवॉर्ड विजेते ,पद्मश्री डॉ मणी भाई देसाई ह्यांनी डॉ रविंद्र भोळेना खास सन्मानपत्र देऊन गौरव केला होता.तसेच राज्यभर अनेक कार्य कर्त्याना स्फूर्ती देण्याचे कार्य करीत असून त्यांनी विविध संस्थांना आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे.