डॉ. रागिब यांनी मुफ्तींची माफी मागावी: कार्यकर्त्यांची मागणी

0

जळगाव।  जिल्हा समाजवादी पार्टीचे नविन पदाधिकार्‍यांची नियुक्तीबाबत डॉ. रागिब जहॉगिरदार, महानगर अध्यक्ष अशफाक पिंजारी, दानिश अहमद व इतरांनी पत्रकार परिषद घेऊन माजी जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवीबद्दल अतिश गलिच्छ व खालच्या पातळीवर जाऊन मुफ्ती हारुन नदवीची हकालपट्टी करण्यात आली असे खोटे सांगितल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

मुफ्ती हारून नदवी हे समाजवादी पक्षाचे धडाडीचे नेते असून त्यांनी अनेक दिग्गज नेत्यासमोर निवडणुक लढविलेली आहे. शहरामध्ये त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये इबा पटेल यांना हजारो मतदान त्यांना मिळवून दिले आहे. त्यांची लोकप्रियतेमुळे त्यांना अनेक पदे मिळालेली आहे. या पक्षासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे. म्हणून डॉ. रागिब व त्यांचे सोबतचे सर्व पदाधिकार्‍यांनी मुफ्ती हारून नदवीची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांनी दुष्पपरिणामालासमोर जावे लागेल असा इशारा अब्दुल रशीद खान, रफीक नबी, यांनी निवेदनाद्वारे दिला आहे