पुणे । डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे दिला जाणार ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ यंदा जागतिक कीर्तीचे संगणक शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि महाऋषी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट अमेरिकेचे कुलगुरू डॉ. स्कॉट हेरियट यांना जाहीर झाला आहे.
कोथरूड स्थित एमआयटी विश्वशांती विद्यापीठ कॅम्पसमधील संत ज्ञानेश्वर सभागृह येथे शुक्रवारी (29 सप्टेंबर) सायंकाळी 5.15 वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनचे संचालक डॉ. विवेक सावंत आणि शारदा ज्ञानपीठाम्चे अध्यक्ष पंडीत वसंत गाडगीळ यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड यांनी दिली.