तळोदा । धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्याचे भाजपा पक्ष विस्तार योजना समन्वयक म्हणून तळोदा येथील डॉ.शशिकांत वाणी यांची नाशिक येथे पक्षाचा विभागीय बैठकीत महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री प्रा.रवि भुसारी यांनी निवडीची घोषणा केली.पंडित दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्य विस्तार व्हावा म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाने महाराष्ट्रात प्रत्येक विधान सभा क्षेत्रात पक्ष विस्तार योजना या शताब्दी वर्षानिमिताने सुरू केलेली आहे.
विभागीय बैठकीत निवड
धुळे जिल्ह्यातील पाच व नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा या दोन्ही जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रावर नऊ विस्तारकांची नियुक्ति केली. प्रदेश संघटनमंत्री प्रा. रवि भुसारी व विभागीय संघटनमंत्री डॉ.किशोर केळकर यांनी विभागीय बैठकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशकडून नियुक्ती झाल्याचे घोषित केले. निवडीबद्दल त्याचे स्वागत व सत्कार भाजप जिल्हा संघटन मंत्री प्रा.विलास डामरे, नवापूर भाजप तालुकाध्यक्ष एजाज शेख, अक्कलकुवा भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर पाडवी,जि.प.सदस्य सुनील चव्हाण यांच्यासह पदाधिकारींतर्फे करण्यात आला.