शिरपूर। जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 116 वी जयंती शिरपूर शहर व तालुका भाजपातर्फे साजरी करण्यात आली. येथील नगरपालिकेच्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानमध्ये प्रतिमापुजन व माल्यार्पण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. जिल्हाध्यक्ष डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे देशासाठी योगदान असून त्यांच्या स्वप्नातला भारत पंतप्रधान साकार करीत असून जम्मु काश्मिरमध्ये त्यांच्या विचाराचे सरकार असून त्या सरकारमध्ये भाजपाचे उपमुख्यमंत्री आहेत. एक देशात दोन निशान दोन प्रधान चालणार नसल्याचे विचार व कार्य पुर्ण देशात त्यांनी रूजविले असल्याचे बबनराव चौधरींनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, तालुकाध्यक्ष राहूल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिरपूर विधानसभा विस्तारक सागर कोडगीर, अर्जुन महाले, जिल्हाचिटणीस संजय आसापूरे, चंद्रकांत पाटील, जिल्हाकोषाध्यक्ष आबा धाकड, भाजपा अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, जि.प.सदस्य चंद्रकांत पवार. कृउबा संचालक सुकदेव भिल, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, निलेश महाजन, उपाध्यक्ष रोहीत शेटे, प्रशांत चौधरी, चिटणीस राधेश्याम भोई, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपूत, युवामोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मनोज महाजन, विकास सोसायटी अमोदा चेअरमन कृपालसिंह राजपूत, डॉ.मनोज निकम, योगेश भोई, पप्पू पाटील, सचिन सोनार, जितू राजपूत, रवि सोनार, राजाराम पाटील ,गजु पाटील आदी उपस्थित होते.