डॉ .श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने भुसावळ विभागातील भुसावळ यावल व चोपडा येथील शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता अभियान करण्यात आले
डॉ .श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने भुसावळ विभागातील भुसावळ यावल व चोपडा येथील शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता अभियान करण्यात आले
दिनांक १ ऑक्टों 2023 रविवार रोजी भुसावळ यावल व चोपडा येथिल १५ गावे व 3 शहरातील प्रमुख रस्ते यांचे पद्मश्री विभूषित महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय तीर्थरूप डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये ५६० श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
आज सकाळी ७ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत तीनही तालुक्यातील 15 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले .त्याचप्रमाणे १० ते १२ वाजेपर्यंत शहरी भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले .यात एकूण 560 श्री सदस्यांनी ओला २३.८ टन व कोरडा १७.४७ असा एकूण ४१.२७ ट्न कचरा १७ ट्रॅक्टर व ७ रिक्षांच्या मदतीने जमा करण्यात आला .व त्याची प्रशासनाच्या मदतीने व स्वतः काही श्री सदस्यांच्या मदतीने योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. प्रशासनाने देखील या कार्यक्रमात आपले वाहन उपलब्ध करून देऊन सहकार्य दर्शविले. सर्व ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागात कमी प्रमाणात कचऱ्याचे संकलन झाल्याचे या उपक्रमातून निदर्शनास आले.
सदर कार्यक्रमात शहरातील बऱ्याच सन्माननीय व प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील आपला सहभाग वेळेनुसार नोंदवला सकाळपासून नियोजित शांततापूर्ण अशा पद्धतीने शिस्तबद्ध कार्यक्रमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले .
तालुका
रस्त्यांची नावे
रस्त्यांची
लांबी
एकूण
उपस्थित
मनुष्यबळ
गोळा केलेला
ओला कचरा
गोळा
केलेला
सुका कचरा
एकूण
कचरा
वापरलेले
वाहने व प्रकार
ट्रॅक्टर
रिक्षा
भुसावळ
शहर
13
156
0.2
3.1
3.3
4
4
ग्रामीण
11.6
186
13.87
7.89
21.76
6
3
यावल
शहर
2.9
76
6.08
1.52
7.6
2
0
ग्रामीण
5.5
64
2.9
1.9
4.8
1
0
चोपडा
शहर
3.5
78
0.75
3.06
3.81
4
0
एकुण
36.5
560
23.8
17.47
41.27
17
7