डॉ.सबनीस यांच्या अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रद्द

0

एरंडोल। येथील औदुंबर साहित्य रसिक मंचच्या वतीने आयोजित केलेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या मराठी भाषणाचे इंग्रजी भाषेत अनुवादित केलेल्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम तांत्रिक कार्यक्रमामुळे रद्द करण्यात आला असल्याचे मंचचे अध्यक्ष मोहन शुक्ला यांनी पत्राद्वारे कळविले आहे. औदुंबर साहित्य रसिक मंचच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनिस यांनी मराठीत केलेल्या भाषणाचा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आला आहे.

28 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थिती प्रकाशन
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.अनिल माळी यांनी त्यांच्या भाषणाचे इंग्रजी भाषेत अनुवादन केले होते. पिंपरी येथील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांनी देखील औदुंबर रसिक मंचने केलेल्या कार्याचा गौरव केला होता. मंचच्या वतीने इंग्रजी भाषणाच्या पुस्तकाचे प्रकाशन 28 मे रोजी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्रसिद्ध साहित्यिक भाई वैद्य कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, ज्येष्ठ सहित्यिक मुश्ताक अली यांचे उपस्थितित करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे तसेच मंचच्या सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे मंचचे अध्यक्ष मोहन शुक्ला यांनी कळविले आहे.