उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी व कर निर्धारक युवराज भदाणे यांनी बेशिस्त वर्तुणूक केल्याच्या आरोपावरून समाजसेवक डॉ सुरेश गवई यांनी मनपा मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. डॉ गवई यांनी सादर केलेल्या वादग्रस्त मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत या गोष्टीचा राग मनात ठेऊन माझ्यावर बिनबुडाचा आरोप भदाणे यांनी केला आहे.
उल्हासनगर शहरातील समाजसेवक डॉ सुरेश गवई हे सोमवारपासून मनपाच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी व कर निर्धारक युवराज भदाणे यांच्याकडे आपण एका मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी गेलो असता त्यांनी माझे कागदपत्रे फाडून दिले व बेशिस्तपणाचे वर्तन केल्याचा आरोप डॉ गवई यांनी केला आहे. युवराज भदाणे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी उपोषणाद्वारे केली आहे. परंतु हे आरोप बिनबुडाचे असल्याचे भदाणे यांचे म्हणणे आहे.