जळगाव। रनर्स गृपचे डॉ.रवि हिरणी व स्वप्नील मराठे यांनी औरंगाबाद येथे 600 कि.मी.चे सायकलिंग 39 तासात पुर्ण केली आहे. जळगाव जिल्ह्यातुन 600 कि.मी. सायकलिंग करणारे ते पहिलेच सायकलपटू ठरले आहेत अशी माहिती किरण बच्छाव यांनी पत्रपरिषदेत दिली.याप्रसंगी जळगाव रनर्स ग्रुपचे विक्रांत सराफ, डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. रवि हिरणी व स्वप्नील मराठे यांनी सायकलींग स्पर्धेची माहिती देवून सहभाग कसा घेता येईल याची सविस्तर माहिती दिली.
19 स्पर्धक सहभागी
ऑडेक्स इंडिया ऑर्गनायझर ही देशात अल्ट्रा सायकलिंगचे आयोजन करत असते. ज्या ठिकाणी चौपदरी मार्ग आहेत अशा ठिकाणी आयोजन केले जाते. 26ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जळगाव, धुळे, नाशिक, हैदराबाद, पुणे व औरंगाबाद येथून 19 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेकांना 40 तासात 600 कि.मी.सायकलींग करावयाची होती. औरंगाबाद ते वाटूर फाटा 100 कि.मी.व वाटूर फाटा ते औरंगाबाद 100 कि.मी.औरंगाबाद ते शिक्रापूर 200 किे.मी. व शिक्रापूरते औरंगाबाद 200कि.मी. असे एकूण 600 कि.मी. अंतर 40 तासात पुर्ण करायचे होते. दर 100 कि.मी अंतरावर एक चेक पॉईंट होता. तेथे मार्शल असायचा त्याने कार्डवर सही करून शिक्का मारल्या नंतरच पुढे जायचे असते. सलग 39 तास 2 मिनीट सायकलींग केले. यात रात्री 1.15 ते 2.15 या कालावधीत विश्रांती केली. यामार्गत 11 घाटातुन त्यांनी सायकल चालविली. 19 स्पर्धकांपैकी केवळ 8 जण 600 कि.मी. अंतर पुर्ण करू शकले. स्वप्नील मराठे यांनी एका वर्षात 200 , 300,400 व 600 कि.मी. सायकलींग केले. या वेळी दोघांनी सायकलींग करतांनाचे अनुभव कथन करून शहरातील सायकलप्रेमींनी देखील अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केल. ते दोघे 5 तासात 11 घटातुन सायकलिंग करून सुपर र्याडोनियन ठरले आहेत. तसेच स्पर्धेंसाठी शहरात सरावासाठी उपलब्धता नसतांनी या दोघांनी हे सायकलिंग करू यश मिळविले आहे.