डोंगरकठोरा । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा फाट्यावर दगड मारून बसची काच फोडल्याची घटनासमोर आली आहे. यावल डेपोची बस (एमएच 20 9477) जात असतांना डोंगर कठोरा फाट्यावर काहींनी दगड मारून बसची काच फोडली. या घटनेत मात्र कोणाला दुखापत झालेली नाही. दरम्यान या घटनेनंतर बस परत डेपोत नेण्यात आली व यावल डेपोतून बस सेवा बंद करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वत्र बंद पडला जात आहे. बंद शांततेत पाळावा असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे.