यावल- तालुक्यातील डोंगरकठोरा येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. डोंगरकठोरा येथे राहणारी व इयता बारावीत शिकणारी अल्पवयीन तरुणी 19 जुन रोजी दुपारी 12 वाजता दुपारी वाजेच्या सुमारास यावल येथे शाळेची एस.टी.पास काढण्यास गेल्यानंतर उशिरापर्यंत घरी न परतल्याने अल्पवयीन तरुणीचे काका यांनी शुक्रवार, 21 जुन रोजी यावल पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चिंचोलीच्या अल्पवयीन तरुणीस पळवणार्या संतोष धनासिंग रणसिंगे या तरुणासह त्या तरुणीला पातोंडा, ता.अमळनेर येथून गावातील तरुणांनी शोधून काढत शुक्रवारी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.