जळगाव- दलित वस्ती सुधार योजनेअंर्तगत यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे 2017-18 या वित्तिय वर्षाचा निधी दलित वस्तीच्या रस्त्यांवर न खर्च करता इतरत्र खर्च करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आनंद मेघे यांनी केली होती. यानुसार आज त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांची त्यांनी भेट घेतली असता या कामांच्या चौकशीसाठी नवीन अधिकारी नियुक्त करून लवकरच चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
अधिकार्यांचे आश्वासन
आनंद मेघे यांनी गटविकास अधिकार्यांकडे जुलै 2017 मध्ये यासंदर्भात तक्रार केलेली होती. हा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील रस्त्यांसाठी खर्च करावा, असा ग्रामपंचायतीने ठराव केला होता. मात्र हा निधी इतरत्र वापरण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंदर्भात तालुकास्तरी अधिक ार्यांनी चौकशी केली मात्र, ग्रामपंचायतीने केलेला ठराव हा मोघम होता, असे अधिकार्यांचे म्हणणे होते. मात्र प्रोसींडींगमध्ये खाडाखोड करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर संबधित तक्रारदारांनी आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेतली असता यासंदर्भा चौकशीसाठी नवे अधिकारी नेमून पुन्हा चौकशी करू व त्यानुसार आलेल्या अहवालावरून निर्णय घेऊ, असे आश्वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी दिले आहे.
जिल्हाभरात 28 कोटींचा निधी
जळगाव- दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 19-20 सालच्या 28 कोटींपैकी 11.62 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आल्या असून उर्वरित निधीसाठी प्रस्ताव मागविण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या 25 कोटींच्या सर्व कामांना मान्यता मिळाल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सांगितले. ग्रामपंचायतींकडून पुरेशे प्रस्तावर अजूनपर्यंत आलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत 11.62 कोटींच्या क ामांना मान्यता देण्यात आल्या आहेत. कामे लवकर मार्गी लाण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यतांसाठी लवकर हालचाली केल्या जात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. हा निधी मार्च 2020 पर्यंत खर्च करायचा आहे.