डोंगरकठोरा शिवारात अस्वलाचा शेतकर्‍यावर हल्ला

0

यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा शेतशिवारात एका अस्वलाने शेतकर्‍यावर हल्ला करत जबर जखमी केले आहे. शेतकर्‍याचे नाव ज्ञानेश्वर सुका बाविस्कर असे असून ही घटना बुधवारी सकाळी गावालगतच्या शेतात घडली. या घटनेमुळे शेतकरी व मजूरवर्गात भीती निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर सुका बाविस्कर (वय 45, रा. डोंगरकठोरा, ता. यावल) हे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास केळी बागेत पाण्याच्या व्हॉल्व्ह बदलण्यास शिरलेे असता अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढवला.