यावल- तालुक्यातील डोंगरकठोरा येथील रहिवासी व दलित चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते वनवास किटकुल आढाळे (85) यांचे 29 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आढाळे हे आपल्या घरासमोर बसले असताना उष्माघातामुळे त्यांना भोवळ येवून ते पडले व त्यांचा मृत्यू झाला. वनवास किटकुल आढाळे हे डोंगरकठोरा येथील पत्रकार बाळासाहेब आढाळे, राजेन्द्र आढाळे तसेच डोंगरकठोरा गावाचे पोलीस पाटील राजरत्न आढाळे, यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 30 रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुल, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परीवार आहे.