शहादा। तालुक्यातील डोंगरगाव येथील शाळकरी मुलगा शेतात काम करत असतांना विजेचा शॉक लागुन मयत झाल्याची घटना घडल्याने गावात शोककळा पसरली होती. काल दि 25 जुन रोजी आपल्या शेतात दिवेश रणजीतसिंग गिरासे (वय 15) हा विद्युत मोटार सुरु करायला गेला असता,लोखंडी पेटीत विद्युत प्रवाह उतरला होता. त्याचा जोरदार शॉक लागल्याने मयत झाला.
पावसामुळे विद्युत प्रवाह पेटीत उतरला होता.दिवेश हा पुरुषोत्तम नगर येथील वाल्मीकि विद्यालयात इयत्ता 9 वीत शिक्षण घेत होता. त्याचे वडिलांचे आधीच निधन झालेले आहे.त्याला आई व एक लहान भाऊ आहे. आज सकाळी 10 वाजता त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहादा पोलीसात अकस्मात मृत्यू म्हणून गुन्ह्याची नोंद केली आहे.