डोंगरगाव जिल्हा परिषद केंद्रशाळेत जागतिक योगदिन साजरा

शहादा : तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद केंद्रशाळेत जागतिक योगदिन साजरा करण्यात आला .
यावेळी केंद्रप्रमुख शंकर अहिरे यांनी योग दिनाबद्दल माहिती सांगताना योगासने व प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहते फक्त योगदिनी योगासने न करता नियमित केले पाहिजेत असे सांगुन ते पुढे विद्यार्थी व शिक्षकांना सुचना करतांना म्हणाले की, योग दिनानिमत्त योगासने न करता शिक्षकांनी दररोज शाळेत एक तास विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणांबरोबर क्रीडा शिक्षण महत्त्वाचे आहे . क्रीडा शिक्षणामुळे शारीरिक दृष्ट्या मजबूत व निरोगी राहातील. अशाही सुचना केंद्र प्रमुख शंकर अहिरे यांनी दिल्यात.

यावेळी योगासने व प्राणायाम सलीम पिंजारी, उज्वला पाटील स्वाती पाटील सूर्याताई फड यांनी मुलांकडून करून घेतले यात पूरक हालचाली, मानेच्या हालचाली, खांद्याच्या हालचाली,कंबरेच्या हालचाली,पायांच्या हालचाली, योगासनांचे ताडासन ,पादहस्तासन,अर्ध चक्रासन, त्रिकोणसन ,भद्रासन, वक्रासन आदी प्रकार करून घेतले तसेच कपालभाती, अनुलोम विलोम,भ्रामरी प्राणायाम करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील संतोष कुवर, विजया बोरसे,आशालता शिंदे, बिंदा पावरा, वंदना कोळी यांनी सहभाग घेतला