डोंगरगाव येथे गुरूवारी आई बिजासणी मातेची प्राणप्रतिष्ठा

0

कहाटुळ । आई बिजासणी माता मंदिराचे प्राणप्रतिष्ठान सोहळा डोंगरगाव येथे 13 ते 15 जून दरम्यान होणार आहे. डोंगरगाव ता. शहादा येथे आई बिजासणी मोतचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात आई बिजासणी मातेची मूर्तीचे आणि नवदुर्गा माता मूर्तींचे प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुजारी आचार्य वे.मु. द्वारकेश बुवा गुरूजी आणि उपाचार्य हभप खगेंद्र महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजा होणार आहे. 13 जून रोजी सकाळी 9 ते 12 या कालावधीत शोभा यात्रा निघणार आहे. तसेच 14 जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर 15 जून रोजी कलश पूजन, मूर्ती प्रतिष्ठा, पूर्णाहूती महाआरती सकाळी 9 ते 1 आणि महाप्रसाद व भंडारा दुपारी 1.30 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. तरी याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आई बिजासणी परिवार व सोलंकी परिवार व समस्त डोंगरगाव ग्रामस्थांनी केले आहे.