यावल : तालुक्यातील डोंगरदे येथील कला, वाणिज्य व कॉम्प्युटर अॅप्लीकेशन महिला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबीराचे उद्घाटन समारंभ शनिवार 17 डिसेंबर रोजी डोंगरदा पाडा येथे संपन्न करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सुमनताई वाघ, सरपंच डोंगरकठोरे ह्या होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुरेश एल.पाटील यांनी स्वीकारले. तसेच महिला महाविद्यालयाचे सचिव डॉ.राजेंद्रकुमार झांबरे व संस्थेचे संचालक मुरलीधर पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रा.शकुंतला भारंबे यांनी केले. तसेच या सात दिवशीय हिवाळी शिबिरात स्त्री आरोग्य व स्त्री सक्षमीकरण यावर भर देण्यात येणार आहे.
विविध कार्यक्रमांबाबत केले मार्गदर्शन
रक्तगट तपासणी, स्त्री योगा अभ्यास, स्त्री आरोग्य व बालरोग आरोग्य शिबिर तसेच पुष्प औषधी व्याख्यान, आनंदा तायडे यांचे कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दररोज 8 ते 10 सकाळी यावेळेत केलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून सुरेश पाटील तथा संस्थेचे अध्यक्ष यांनी महाविद्यालयीन शिबिरार्थी विद्यार्थीनींना ठामपणे प्रतिपादन की सद्याच्या परिस्थितीत कठोर अभ्यास करून स्पर्धेत उतरावे ही काळाची गरज आहे. तसेच सचिव डॉ.राजेंद्रकुमार झांबरे यांनी स्त्री आरोग्य व स्वच्छता याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा भारंबे तर कु.सपना बारी यांनी आभार मानले. याप्रसंगी डोंगरदे येथील ग्रामस्त व महिला भगिनी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप भोळे व कार्यक्रम अधिकारी डॉ.शकुंतला भारंबे, प्रा.मोरे व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.