डोंगर कठोरा येथील हरिभक्तांची पावसासाठी देवाकडे साकडे
देवाची करणी आणि नारळात पाणी..वरुणराज्याच्या कृपेने दिंडीवर मुसळधार पावसाचा वर्षाव
भुसावळ प्रतिनिधी दि 1
गेल्या २० ते २२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये कमालीची चिंता व्यक्त करण्यात येत होती सदरहू सदरील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या वरून देवाला प्रसन्न करण्याकरिता तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी विठ्ठल मंदिर व गढीवरील विठ्ठल मंदिरातील हरिभक्त यांच्या विद्यमाने काल दि.३१ ऑगस्ट गुरुवार रोजी येथून जवळच असलेल्या डोंगरदा येथील पंत मंदिरातील दत्तात्रय महाराज यांना पाऊस पडण्याकरिता साकडे घालण्यात आले.यानिमित्ताने हरिनामाचा गजर करीत व ग्रामदेवतांची पूजा करून गावातून दिंडी प्रदक्षिणा घालून ४ कि.मी.वर असलेल्या डोंगरदा तीर्थक्षेत्रापर्यंत भर उन्हामध्ये पायी दिंडी काढण्यात आली.दरम्यान श्रीक्षेत्र डोंगरदा येथे हरिभक्तांच्या वतीने तब्बल तीन तास भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.प्रसंगी हरिभक्त चंद्रकांत भिरूड व दिनकर ओंकार पाटील यांच्या वतीने उपस्थित भाविक हरिभक्तांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली तसेच चहापाण्याचा खर्च पाटील,सरोदे व कोलते परिवाराच्या वतीने करण्यात आला.यावेळी पाऊस आल्याशिवाय घरी जायचे नाही असा चंग हरिभक्तांनी बांधला आणि काय आश्चर्य गेल्या २०-२२ दिवसांपासून गायब असलेला पाऊस हरिभक्तांच्या मदतीला धावून आला व हरिभक्तांच्या अंगावर धो-धो पाऊस कोसळू लागला.सदरील पाऊस हा शेजारील गावांवर पडला नाही तर केवळ दिंडी भागातच मुसळधार पाऊस पडला हे विशेष ! दरम्यान उपस्थित हरिभक्तांनी मुसळधार पावसात चिंब भिजून पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.प्रसंगी भर पावसातच दिंडीतील हरिभक्तांनी गावांमध्ये प्रवेश करून नगर प्रदक्षिणा केली यावेळी ठिकठिकाणी भाविकभक्तांच्या वतीने हरिभक्तांची आरती ओवाळून दिंडीचे स्वागत करण्यात आले.
सदरील दिंडी सोहळ्यात ह.भ.प.दत्तात्रय महाराज गुरव,दिनकर सेवाकराम पाटील,रवींद्र मुरलीधर पाटील,शालिक झोपे,दगडू पाटील,प्रकाश पाटील,पांडुरंग जावळे,धर्मा बाऊस्कर,नारायण कुरकुरे,सुरेश भिरूड,राहुल आढाळे,ज्ञानदेव पाटील,अरविंद पाटील,रेवानंद पाटील,डालू फेगडे,सुरेश कळसकर,जनार्दन जंगले यांच्यासह पंचवटी विठ्ठल मंदिर व गढीवरील विठ्ठल मंदिरातील महिला व पुरुष आबालवृद्ध हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.