डोंबिवलीच्या गणेश दर्शन स्पर्धेत जोशी मित्र मंडळ अव्वल

0

कल्याण : डोंबिवली शहर शिवसेना आणि शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यामाने 2016 मध्ये घेण्यात आलेल्या गणेशदर्शन स्पर्धेत पश्चिमेकडील जोशी मित्र मंडळाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आईच्या दुधाचे महत्व विशद करणारा दृकश्राव्य माहितीपट दाखवून समाज प्रबोधन केले.

मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जोशी यांचा पारितोषिक प्रदान करून त्यांना सन्मानित केले. तर शिवनेरी गणेशोत्सव मित्र मंडळाने द्वितिय आणि गणेश मंदिर संस्थान हे तृतिय क्रमांकाचे हे मानकरी ठरले. या दोघांनीही अनुक्रमे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियानाचे महत्व पटवून देणारे देखावे साकारले होते. येथील आदित्य मंगल कार्यालयात शनिवारी संध्याकाळी हा सोहळा संपन्न झाल प्रथम क्रमांकासाठी 31 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, द्वितियसाठी 21 हजार तर तृतियसाठी 11 हजारांचे रोख पारितोषिक सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.