डोंबिवलीतील रिक्षा चोरट्याच्या रडारवर

0

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड दत्तनगरमधील रवींन्द्र महाजन निवासमध्ये राहणारे विलास मोरे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री घरी परतल्यानंतर आपली रिक्षा घराजवळील मनोज स्टोर्सजवळ उभी करत घरी निघून गेले. अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास ही रिक्षा चोरून तेथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी कालपर्यंत रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा न सापडल्याने मोरे यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोड जय हिंद कॉलनी परिसरात जपुरू सदन येथे राहणारे रिक्षाचालक अरुण सिंग यांनी रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यानंतर आपली रिक्षा भवानी सदन इमारतीच्या मागील बाजूस उभी केली. रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याची रिक्षा चोरून नेली. कालपर्यंत शोध घेवून ही रिक्षा न सापडल्याने अरुण सिंग यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.