डोंबिवलीत घरफोडी

0

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव परिसरात सखुबाई निवास मध्ये राहणारे विशाल पाटील शनिवारी सायंकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावत बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी रविवारी पहाटेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील एक लाख 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. रविवारी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पाटील यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.