डोंबिवलीत चोरट्यांची गटारी

0

कल्याण : मुंबई येथे राहणार्‍या महिलेने डोंबिवली पुर्वेकडील ज्योती नगर झोपडपट्टीमध्ये एका खोलीत दोन बकर्‍या व एक बोकड पाळला होता. मात्र 15 तारखेला रात्रीच्या सुमारास या दोन बकर्‍या व एक बोकड अज्ञात चोरट्याने झोपड्यातून पळवून नेले. सकाळी ही गोष्ट लक्षात येताच तिने आजूबाजूला शोधाशोध केली. मात्र बकर्‍या आणि बोकड न आढळल्याने या महिलेने याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.