डोंबिवलीत तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

0

कल्याण । 19 वर्षीय मुलीवर एका इसमाने घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास चाकू उगारून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना डोंबिवलीत उजेडात अली आहे. सदर पीडित मुलगी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी एकटी असताना साहिल मोरे नावाचा इसम तिच्या घरात घुसला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केल्याने आजू बाजूच्या नागरिकांनी तिच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र त्यामुळे घाबरलेल्या मोरे याने आपल्याजवळील चाकू उगारत तिला घडल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी साहिल मोरे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.