कल्याण । शुक्रवारी दुपारच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील जकात नाक्याजवळ एका रिक्षाचालकाने भरदिवसा एका महिलेला रिक्षात जबरदस्तीने बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याच दरम्यान मोटरसायकलीवरून आलेल्या दोन धाडसी तरुणांनी रस्त्यावरील एका महिलेचा आरडाओरड ऐकल्यावर त्या रिक्षाचा पाठलाग करून त्या रिक्षाचालकाला पकडले. त्या रिक्षाचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शंकर विसलावथ असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे आहे. मात्र रिक्षाचालकाला पकडणार्या त्या दोन तरुणाचे नाव समजू शकले नाही.
संतप्त महिलांनी रिक्षाचालकाला विचारला जाब
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भाजपच्या पदाधिकारी मनीषा राणे ह्या त्याच्या मैत्रिणीबरोबर स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या. स्टार कॉलनी येथे आल्यावर त्यांनी विसलावथ याच्या रिक्षात बसल्या. मात्र त्यावेळी एका वृद्ध पेंढारकर कॉलेजजवळ जाण्यासाठी त्या रिक्षाजवळ आला. जास्त भाडे मिळेल म्हणून रिक्षाचालकाने त्या त्या महिलांना स्टेशनला जाणार नाही असे सांगत त्या वृद्धास रिक्षात बसवले. संतापलेल्या त्या महिलांनी रिक्षाचालकाला याचा जाब विचारला.
गांधीनगर जकात नाक्याजवळील घटना
त्यामुळे रिक्षाचालकाने त्या महिलेशी वाद घालत रिक्षात कुणालाही न बसवता निघून गेला. त्या महिला दुसर्या रिक्षात बसून जात असताना गांधीनगर येथील जकात नाक्याजवळ त्या रिक्षाचालकाला बघितले. त्यांनी रिक्षातून उतरून रिक्षाचालक विसलावथ याला त्या बद्दल जाब विचारला. काही वेळाने या मुजोर रिक्षाचालकाने त्या एका महिलेला जबरदस्ती रिक्षात बसून रिक्षा सुरु केली. त्यावर राणे यांनी आरडाओरड सुरु केली. त्यावेळी मोटरसायकलीवरून जात असलेल्या दोन तरुणांना राणे यांनी त्या रिक्षाचालकाला पकडण्यास सांगितले.