डोंबिवलीत मोबाइल हिसकावला

0

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड सिद्धीविनायक दर्शन संघवी गार्डनमध्ये राहणारे विकास पांढरे सांगाव परिसरातून जात असताना एकाने त्यांना हटकले. या इसमाने त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत इसमाने हातचलाखीने पांढरे यांच्या खिशातील मोबाईल खेचून पळ काढला. या प्रकरणी पांढरे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मैत्रीस नकार दिल्याने धमकावले
कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरात राहणारी पीडित तक्रारदार तरुणीची याच परिसरात राहणार्या रुपेश पाटील नावाच्या तरुणाशी मैत्री होती. मात्र रुपेशची व्यसनाधीनता आणि त्याच्या संशयी वृत्तीमुळे या तरुणीने त्याच्याशी मैत्री ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या कुटुंबियांनाही धमकावले होते. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.