डोंबिवलीत मोलकरणीचा विनयभंग

0

विष्णूनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

कल्याण । आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने धुणी भांडी करत आपल्या संसाराचा गाडा हाकणार्‍या महिलेचा तिच्या मालकिणीच्या मुलाने विनयभंग केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने विष्णू नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्बन क्रास्टा असे या तरुणाचे नाव आहे. पीडित महिला घरकाम करून आपल्या संसाराचा गाडा हाकते. गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्‍चिमेकडील भगवती इमारतीमध्ये बेन्नी कास्टा यांच्या घरात काम करत होती.

दरम्यान पीडित महिला घरात भांडी घासत असताना कास्टा यांचा मुलगा अल्बन याने तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. या प्रकरणी पीडित महिलेने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अल्बन विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.