डोंबिवलीत शिवसेना उपशाखाप्रमुखावर हल्ला

0

कल्याण : डोंबिवली जवळील लोढा हेवन निळजे येथे गेल्या वर्षी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखावर तीन अज्ञात तरुणांनी धारदार शास्त्रांनी वार केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली. हा हल्ला होण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश कदम असे या ह्ल्ल्यात जखमी झालेल्या उपशाखाप्रमुखाचे नाव आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास निळजे येथील रॉयल सर्कल जवळ आल्यावर त्याच्या मोबाईल फोन आला. मोबईलवर बोलण्यासाठी कदम यांनी रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून मोबईलवर बोलत होते. अचानक पाठीमागून मोटरसायकलीवरून आलेल्या तीन तरुणांप एकाने कदम यांच्यावर धारदार शास्त्रांनी वार केला. मात्र कदम यांनी वार चुकवल्याने त्यांच्या उजव्या दंडावर वार झाले. वार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. अचानक हा प्रकार घडल्याने कदम यांना हल्लेखोरांचे चेहरे पाहता पक्षाचे काम करीत असताना अश्या प्रकारे हल्ले होत असल्याने काम कसे करायचे असा प्रश्न पडल्याचे सांगितले. मात्र हा हल्ला राजकीय पूर्ववैमस्यातून झाली कि पूर्ववैमस्यातून झाला हे अद्याप समजू शकले नाही. यापूर्वी सतीश पाटील या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती.