कल्याण : डोंबिवलीत पश्चिम विष्णूनगर पोलीस ठाण्याजवळ असलेले श्री गणेशाचे जुने मंदिर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या “ह “प्रभागाने आज कडक बंदोबस्तात जमीनदोस्त केले.
डोंबिवली पश्चिमेकडील विष्णू नगर पोलीस ठाणे व रेल्वे स्थानकासमोर रस्त्याच्या मध्ये व फुटपाथवर लक्ष्मण पाटील यांनी झाडाखाली छोटे मंदिर उभारले होते.दर मंगळवारी व गणेश उस्तवात भाविकांची गर्दी होत होती.जागृत देवस्थान असा लौकिक असणाऱ्या मांदिराच्या मालकांना पालिकेने नोटीस दिली होती.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळे निष्काशीत करण्यात येत अडल्याचे प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले.डोंबिवलीत अशी 5 धार्मिक स्थळे असून त्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कडक बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही कारवाई करण्यात आल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली .