नवापूर:तालुक्यातील आदिवासी सहकार साखर कारखाना डोकारे परिसरात रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग नेमके कशामुळे लागली त्याचे कारण समजु शकले नाही. घटनास्थळी अग्निशमक दल वेळीच दाखल झाले होते. डोकारे ग्रामस्थांनी आगीच्या ठिकाणी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
नवापूर तालुक्याच्या विकासात भर टाकणार्या डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याला दुपारी 3 वाजेच्या सुमारास आग लागल्याने कारखाना भागात धावपळ उडाली. नगर पालिकेचे अग्निशमन बंब वेळीच दाखल होऊन स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविली. 2 तासानंतर आग आटोक्यात आली. आगीत कारखान्याच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्याचे तापमान वाढत असुन पारा 40 च्यावर पोहचल्याने तीव्र उऩ्हाने कोरड्या चार्याला आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण समजु शकले नसल्याने कारखान्याचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.