डोक्यात टामी मारल्याने एक गंभीर जखमी

0

चाळीसगाव – मागील भांडणाच्या कारणावरून एकाच्या डोक्यात लोखंडी टामी मारुन गंभीर जखमी केल्याची घटना ८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नाईकनगर ब्राह्मणशेवगे गावी घडली होती आज १२ ऑक्टोंबर रोजी वैद्यकीय दाखल दिल्यावरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नाईकनगर ब्राह्मणशेवगे येथे मागील भांडणाच्या कारणावरून तुकाराम दुधा राठोड (वय- ४८) यांना गावातील आरोपी योगेश ज्ञानेश्वर राठोड याने शिवीगाळ, धमकी देवुन त्यांच्या डोक्यात लोखंडी टामी मारुन गंभीर जखमी केले होते. तेव्हापासुन तुकाराम राठोड हे चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज १२ ऑक्टोंबर 2018 रोजी त्यांनी वैद्यकीय दाखला मेहुणबारे पोलीस स्टेशनला आरोपी योगेश ज्ञानेश्वर राठोड रा. नाईकनगर ब्राह्मणशेवगे ता. चाळीसगाव याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार मिलींद शिंदे करीत आहेत.