डोक्यात दगड टाकून आईचा निर्घृण खून

0

साक्री । स्वत:च्या आईच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्घण खून करणार्‍या तरुणाला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सायमल दुर्जन देसाई (वय 32) रा.टेंभा प्र.वार्सा ता. साक्री यांनी पिंपळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.21 रोजी दुपारी 12 वाजेपुर्वी अहिल्याबाई दुर्जन देसाई (वय 50) या महिलेला तिचा मुलगा रायमल दुर्जन देसाई याने ठार मारले. रानमळात तिच्या डोक्यात दगड घालुन तिचा निर्घूण खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलिस स्टेशनचे पीएसआय खटकळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी रायमल देसाईला अटक केली. भादंवि 302 प्रमाणे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायकवाड चौकात महिलेवर चाकू हल्ला
किरकोळ कारणावरुन गायकवाड चौकात दि.21 रोजी रात्री महिलेला मारहाण करुन तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. रोडवरील गायकवाड चौकात राहणार्‍या सोनाली प्रकाश अहिरे (वय 25) या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार घरातील खरकटे अंगणात का टाकले अशी विचारणा केल्याच्या कारणावरुन सोनाली अहिरे यांना माया योगेश अहिरे ,आरती पांडूरंग अहिरे,योगेश पांडूरंग अहिरे, दिनेश पांडरंग अहिरे यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली. दिनेश अहिरेने सोनाली यांच्यावर चाकुने हल्ला केला.त्यात सोनाली यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.

अहिल्यादेवी नगरातील तरुणी बेपत्ता
शहरातील मिल परिसरात अहिल्यादेवी नगरात राहणारी सुकन्या जितेंद्र मोरे (वय 19) हि तरुणी दि.21 रोजी सकाळी 10.30 वाजता घरातुन बेपत्ता झाली आहे. जितेंद्र गंगाधर मोरे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सुकन्या हि रविवारी सकाळी शिवणकामासाठी तृप्ती कुलकर्णी यांच्याकडे जावून येते असे सांगून घरातुन बाहेर पडली.मात्र ती घरी परतलीच नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे.