जळगाव । डोक्यावर दगड मारून फेकणार्या प्रभाकर गोविंदा कोष्टी (वय-59) यास कोर्ट उठे पर्यंत शिक्षा सुनावली आहे. स्वयंपाक बनवितांना चुलीचा धुर घरात गेल्याच्या कारणावरून महिलेशी दोघांना भांडण करून एकाने तिच्या डोक्यावर दगड मारून फेकल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. यानंतर याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटला हा न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होता.
चुल विझविण्यावरुन पेटला होता वाद
नशिराबाद येथील कलाबाई पांडूरंग पाचपांडे ह्या 17 जानेवारी 2015 रोजी सकाळी 8 वाजता घराबाहेर चुलीवर स्वयंपाक करीत असतांना शेजारील पुष्पाबाई मारोती कोष्टी यांच्या घरात चुलीचा धुर गेल्याने त्यांनी चुलीत पाणी ओतून चुल विझविली. पुष्पाबाई यांनी दिर प्रभाकर गांविदा कोष्टी यांना बोलवून कलाबाई यांच्याशी वाद घालून प्रभाकर कोष्टी याने कलाबाई यांना दगड मारून फेकला. यात कलाबाई यांच्या कपाळाला दगड लागल्याने नशिराबाद रूग्णालयात उपचार करण्यात आले. पुष्पाबाई कोष्टी व प्रभाकर कोष्टी या दोन्ही दिर-भावजयीविरूध्द नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा खटला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात सुरू झाला होता. याप्रकरणी सकरारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी चार साक्षीदार तपासले.
न्यायालयाचा निकाल
वाद घालून दगड मारून फेकल्याप्रकरणी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांनी बुधवारी निकाल दिला. त्यात न्यायधीश पाटील यांनी आरोपी प्रभाकर गोविंदा कोष्टी याला कलम 337 नुसार कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. यासोबतच कलाबाई यांना चारशे रुपये नुकसान भरपाईचे आदेश दिले आहे. सरकारतर्फे अॅड. आशा शर्मा, आरोपीतर्फे पंकज पाटील होते.