डोक्यात लोखंडी पाईप टाकत व्यावसायीच्या हातातून एक लाख लांबवले

Lakh cash from a grocer in Bodwad city was delayed बोदवड : किराणा व्यावसायीकाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून एक लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार, 10 रोजी रात्री सव्वानऊ वाजता जैन मंदिराजवळ घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध
तक्रारदार तथा किराणा व्यावसायीक विनय पारसमल बाफना (39, प्रभाग क्रमांक सहा, बोदवड) असून बुधवार, 10 रोजी रात्री सव्वानऊ वाजता दुचाकीने घराकडे निघाले असता त्यांच्या घराजवळील जैन मंदिराजवळ अज्ञात आरोपीने बाफना यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारल्याने ते जमिनीवर कोसळले तर आरोपीने दुचाकीला लावलेली बॅग लांबवली. या बॅगेत एक लाख एक हजारांची रोकड होती. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.