दुबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी सध्या पाकिस्तान मध्ये आहे. मालिकेपूर्वी त्यांचा पाकिस्तान अ संघाविरुद्ध ४ दिवसीय सराव सामाना दुबईत सुरू आहे. क्षेत्ररक्षण करताना मॅट रेनशॉच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातामुळे रेनशॉ साराव सामन्यात पुढे खेळणार नाही. स्पिनर नाथन लॉयन गोलंदाजी करताना आबिद अली ने जोराचा फटका मारला, तेव्हा तो चेंडू शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रेनशॉच्या हेलमेटवर चेंडू आदळला आणि चेंडू हवेत उडाला, त्यानंतर तो चेंडू यष्टीरक्षक टीम पेनने पकडला. यातून ऑस्ट्रेलियाला बळी मिळवता आला, मात्र जोरदार फटका डोक्याला लागल्याने तो खाली कोसळला.
यापूर्वी डोक्यावर चेंडू लागल्याने फ्लिप ह्युजला जीव गमवावा लागला होता.