डोक्याला बंदूक लावून धमकी देत कोळीपेठेतील तरुणावर चॉपरने वार

0

जुन्या वादातून घटना ; शनिपेठ पोलिसात चौघाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव- महिनाभरापूर्वी डी.जे.वाजविण्यावरुन झालेल्या वादातून कोळीपेठेतील महेंद्र तुकाराम सोनवणे वय 35 या तरुणावर तीन ते चार जणांनी चॉपर पोटात खुपसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना स्वातंत्र्यदिनी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी दोन संशयित तरुणांनी महेंद्रच्या डोक्याला पिस्तूल लावून कोणच्या भरोशावर मातला असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही प्रकार घडला. मारहाणीत गंभीर जखमी महेेंद्रवर जिल्हा रुयाप्रकरणी चार जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी शनिपेठला भेट देवून गुन्हयाची माहिती जाणून घेतली.

काय होता वाद
कोळीपेठेत तरुणाचे दोन गट आहे. या दोन्ही तरुणांच्या गटात अद्यापर्यंत तीन वेळा विविध कारणांवरुन निमित्त होवून समोरासमोर गट आले की , वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आहे. त्याप्रकरणी गुन्हे दाखल तसेच अदखलपात्र गुन्हयाची दप्तरी नोंद आहे. गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास महेंद्र सोनवणे हा त्याच्या घरी जेवण करत होता, त्यावेळी आकाश उर्फ सोनू सुरेश सपकाळे, सागर उर्फ झपर्‍या सपकाळे, गौरव भारत कुवर, व सोनार (पूर्ण नाव माहित नाही) हे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून महेंद्र उद्देशून कोणाच्या भरोशावर मातला आहे, असे म्हणत आकाश व सागर याने महेंद्रच्या डोक्याला बंदूक लावली. यानंतर हातातील चॉपरने महेंद्रवर डाव्या बाजूला वार केला. यात पोटात गंभीर दुखापत झाल्याने महेंद्रला कुटूंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारार्थ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस उपअधीक्षकांची पोलीस ठाण्याला भेट
महेंद्र सोनवणेच्या फिर्यादीवरुन आकाश उर्फ सोनू सुरेश सपकाळे, सागर उर्फ झपर्‍या सपकाळे, गौरव भारत कुवर, व सोनार (पूर्ण नाव माहित नाही) या जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे करीत आहेत. दरम्यान या गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठले. व पोलीस निरिक्षकांकडून तरुणांच्या जुन्या वादाची तसेच घटनेची माहिती जाणून घेतली.