डोक्यावर चेंडू आदळल्याने पाक फलंदाजाचा मृत्यू

0

कराची । ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्यूजच्या मृत्यूनंतर आणखी एका फलंदाजांचा चेंडू डोक्यावर आदळल्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील एका स्थानिक सामन्यात बाऊंसर चेंडूमुळे जुबैर अहमद नावाच्या फलंदाजांला जीव गमावावा लागला आहे. जुबैर हेल्मेट न घालताच फलंदाजीस आला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट केले की, जुबैरच्या मृत्यूमुळे सेफ्टी गीअर नेहमीच वापरले पाहिजे याची आठवण होते. आमची पूर्ण सहानभुती जुबैरच्या परिवाराशी आहे.

जुबैर अहमदच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा फिलीप ह्यूजच्या मृत्यूच्या आठवणी जाग्या झाल्या. फिलीप ह्युजसारखाच प्रसंग जुबैर अहमदवर ओढावला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्यूज याचा 27 नोव्हेंबर 2014 रोजी चेंडू जोराट डोक्याला लागल्यामुळे मृत्यू झाला होता. ही घटना क्रिकेटच्या इतिहासातील मोठी घटना होती. या घटनेची आठवण होताच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आजचही गद्गदीत होतात.