चाळीसगाव। तालुक्यातील डोणदिगर येथील 16 वर्ष 18 महिने वय असलेली अल्पवीयन तरुणीला तालुक्यातील डोणदिगर येथील आरोपी सुनील राजेंद्र पाटील याने 12 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मोबाईलवर फोन करून बोलावून घेतले व तिला फूस लावून पळवून नेले.
सदरची बाब मुलीच्या पित्याला माहिती पडल्यानंतर त्यांनी त्या मुलाचे पिता राजेंद्र रामकृष्ण पाटील यांचे घरी जाऊन माझी मुलगी व तुमचा मुलगा कुठे आहे अशी विचारणा केली असता त्यांनी माझा मुलगा तुमच्या मुलीला घेऊन पळाला आहे. असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, अशी धमकी दिली. या प्रकरणी मुलीच्या पित्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून वरील दोघा पिता पुत्र आरोपी विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि रमेश मानकर, पोलीस नाईक भूपेश वंजारी, पो.कॉ. विभीषण सांगळे करीत आहेत.