फैजपूर : मारूळ येथील सातपुडा पीपपल्स एज्युकेशन सोसायटीत मारुळ डीएडची प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धत्तीने पैसे उकळण्यात आले शिवाय त्याचे रेकॉर्ड ठेवण्यात आले नाही तसेच खोटे प्रोसेडींग तयार केल्याप्रकरणी संचालकांसह प्राचार्यविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सैयद सलामत अली रजा अली (56, रा.मारूळ, ता.यावल) यांनी फिर्याद दिली.
रेकॉर्ड न ठेवता केली अफरातफर
सैयद सलामत अली रजा अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपुडा पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मारुळ या संस्थेच्या डीएड कॉलेजमध्ये सैयद मोहमद अनिस अमजद अली हे शेड्युल्ड एकवर डायरेक्टर म्हणून पदावर असतांना सैयद मोहमद आसिफ मिया यांनी बोगस प्रोसेडींग तयार करुन व बोगस इलेक्शन दाखवुन अध्यक्ष म्हणून बेकायदेशीररीत्या काम केले. शेख हारून शेख लतीफ खाटीक हे या संस्थेत प्राचार्य असून या तिघांनी संगनमताने कागदपत्रात हेरफार करुन बोगस प्रोसेंडींग तयार केले तसेच डीएडच्या विद्यार्थ्यांकडून अवैधरीत्या मनमानी डोनेशन घेत त्यांचे कोणतेही रेकॉर्ड न ठेवता आलेल्या पैशांची मनमानी करीत अपहार केला एवढेच नव्हे तर संस्थेच्या कारभारात बोगस कागदपत्रके तयार करणे, खोटे प्रोसेडींग तयार करणे व डीएडची अॅडमीशन करतांना विद्यार्थ्यांकडून मनमानी पैसे घेवून कोणतेही रेकॉर्ड ठेवले नाही आणि त्याची अफरातफर केली तसेच संस्थेच्या पदाधिका-यांना विश्वासात न घेता फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार देविदास सुरदास हे करीत आहेत.