ड्रंक अँड ड्राईव्हच्या 333 घटना

0

पिंपरी : शहरामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री मद्य पिऊन गाडी चालवणार्‍या 333 नागरिकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. नवनवर्षाच्या स्वागतासाठी आयोजीत पार्टीमध्ये मद्य पिऊन गाडी चालवणार्‍या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड वाहतुक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली. यामध्ये 333 जणांवरही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त राजेंद्र भांबरे यांनी दिली. एक उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, 30 निरीक्षक, 117 उपनिरीक्षक, एक दंगा काबू पथक आणि 1100 कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.