लखनऊ । उत्तर प्रदेशमधील एताह येथे मिनी बसच्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी कालव्यात कोसळून बसचा अपघात झाला. एका कुटुंबाने ही मिनी बस भाड्याने घेतली होती. साकरौली गावातून आग्राला येत असताना त्यांच्या बसचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार वाहनचालकाला झोप अनावर झाली होती. ज्यामुळे त्याचा बसवरील ताबा सुटला. आधी बस कठड्यावर जाऊन आदळली आणि त्यानंतर कालव्यात कोसळली. या अपघातात 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 24 जण जखमी झाले असून, त्यांना जलेसर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात आले.