मुंबई : मद्यपिंना ड्राय डे आजिबात आवडत नाही. त्यात तो निवडणुकीच्या काळात असेल तर तो आजिबात आवडत नाही, मात्र त्यांची बाजू उचलून धरली आहे ती हॉटेल मालकांनी. निवडणूक काळातील ‘ड्राय डे’ जाचक आणि बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात ठाण्यातील हॉटेल मालक संघटनांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
भ्रष्टाचार आणि अप्रिय घटना टाळण्या
निवडणूक काळात मतदानाची पूर्वसंध्या, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि निकालाचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये काही जण भ्रष्ट मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. निकालाच्या दिवशी उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. अशावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ड्राय डे असतो. राज्यातील दारुची सगळी दुकाने बंद असतात. पण आता वरील तिन्ही दिवशी ड्राय डे रद्द करावा अशी काही हॉटेल चालकांची मागणी आहे.
जाचक आणि बेकायदेशीर असल्याची
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 20, 21 आणि 23 फेब्रुवारी रोजी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही बंदी जाचक आणि बेकायदेशीर असल्याचे हॉटेल संघटनांचे म्हणणे आहे.
सलग तीन दिवस दारू विक्री बंद
21 फेब्रुवारीला 10 महापालिका आणि दुसर्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारीच्या सायंकाळपासून ते 21 फेब्रुवारीला मध्यरात्रीपर्यंत आणि 23 फेब्रुवारीला दिवसभर मद्यविक्रीसाठी बंदी आहे.